भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती
७५ वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झाले, तो काँग्रेस पक्ष आज ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्या कन्हैयाकुमारला सोबत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे. पाद्री जॉर्ज पोनैय्या जो भारतमातेला ‘अपवित्र’ आणि फक्त येशूला मानतो, तसेच हिंदूंच्या देवीदेवतांना न मानता त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करतो, अशांना स्वतःसमवेत घेऊन राहुल गांधी यात्रा काढतात, त्या वेळी त्यांच्या उद्देशावरच प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारे भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?