येत्या १५ दिवसांत तब्येतीची विशेष काळजी घ्या !
काय घडणार आहे ?
वर्षा ऋतूमधून शरद ऋतूत वाटचाल होण्याचा काळ. यालाच ऋतुसंधी असे म्हणतात.
कोणते त्रास वाढतील ?
दमा, सांधेदुखी, आमवात, आत्मप्रतिरक्षा रोग (ऑटोइम्युन डिसीज – Autoimmune Conditions), अम्लपित्त, शीतपित्त, पचनाचे ज्ञात त्रास, कोणतीही साथ असल्यास संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.
काय काळजी घ्याल ?
नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार, मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळावेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली (२१.९.२०२२)