कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील भाजपच्या कार्यालयाजवळ फेकण्यात आला केरोसीन बाँब !
कोईम्बतूर (तमिळनाडू) – येथील भाजपच्या कार्यालयाजवळ २२ सप्टेंबरच्या रात्री अज्ञातांनी केरोसीन बाँब फेकला. यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. बाँब फेकणारे दुचाकीवरून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्ही.के.के. मेनन मार्गावर काही संशयित लोक फिरत असल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्हीच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
Petrol bomb was lobbed near the #BJP office in #Coimbatore hours after the #NIA carried out raids in offices of #PFI and residences of its functionaries in several parts of the state. No damages or injuries were reported.#TamilNaduhttps://t.co/lk1uiyHFzQ
— News9 (@News9Tweets) September 23, 2022