दिवसभरात ४ घंटे भ्रमणभाष हाताळणार्या पालकांमधील चिडचिडेपणात वाढ ! – कॅनडातील संशोधनाचा निष्कर्ष
७५ टक्के पालकांमध्ये नैराश्य !
वॉटर्लू (कॅनडा) – येथील वॉटर्लूू विद्यापिठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये भ्रमणभाष आणि अन्य डिजिटल उपकरणे यांचा दिवसातून ४ घंटे वापर करणार्या पालकांचा त्यांच्या मुलांसमवेत वागण्यात पालट झाला असल्याचे आढळून आले आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी ५ ते १८ वर्षे वयोगटातील २ मुले असलेल्या ५४९ पालकांचे सर्वेक्षण केले. हे संशोधन कोरोनाकाळात झाले. यात डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्याचे आढळले.
१. जे पालक फावल्या वेळेत किंवा आरामाच्या वेळी फोन किंवा अन्य डिजिटल माध्यमांच्या संपर्कात राहतात ते त्यांच्या मुलांवर चिडचिड करतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडतात आणि ओरडतात.
२. भ्रमणभाष आणि अन्य डिजिटल उपकरणे यांचा वापर करणारे पालक ७५ टक्के नैराश्यग्रस्त असतात.
३. वॉटर्लू विद्यापिठातील क्लिनिकल सायकोलॉजीच्या तज्ञ आणि या संशोधनाच्या लेखिका जॅस्मिन झांग म्हणाल्या की, कुटुंब म्हणून पालक आणि मुले दोघांचे वर्तन महत्त्वाचे ठरते. भ्रमणभाषचा अतीवापर करणार्या पालकांच्या वर्तनावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे आढळले.
४. जॅस्मिन झांग यांनी पुढे सांगितले की, जे पालक सामाजिक माध्यमांवर दिवसभरात १ किंवा २ घंटे घालवतात त्यांचे मुलांविषयीचे वर्तन अधिक सकारात्मक रहाते. पालकांनी सामाजिकदृष्ट्या अधिक क्रियाशील रहायला हवे.
संपादकीय भूमिकाविज्ञानाने कितीही प्रगती केली आणि मनुष्यांसाठी विविध सुखसोयी निर्माण केल्या, तरी त्यातून मनुष्याला शाश्वत आणि चिरकाल आनंद न मिळता मनुष्य, समाज आणि वातावरण यांची हानीच होत आहे, हेच गेल्या १० वर्षांत दिसून येत आहे. यावरून आतातरी विज्ञानवादी विज्ञानाचा फोलपणा समजतील का ? |