स्वत:चे अर्धनग्न व्हिडिओ प्रसारित करणार्या अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार !
मुंबई – सामाजिक माध्यमांवर स्वत:चे अर्धनग्न व्हिडिओ प्रसारित करून समाजामध्ये अश्लीलता पसरवून, तसेच लैंगिक भावना भडकावल्याप्रकरणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या विरोधात मुंबईच्या सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
अजय सिंह सेंगर यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, उर्फी जावेद हिची अनेक अर्धनग्न छायाचित्रे गुगलवर उपलब्ध आहेत. ही अर्धनग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहून समाजात लैंगिक गुन्हे घडू शकतात. बलात्कारासारख्या घटना घडू शकतात. उर्फी पुरुषांच्या लैंगिक भावना उत्तेजित करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते रणवीर सिंग, तर काही वर्षांपूर्वी मिलिंद सोमण यांनी स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. केवळ स्त्री आहे म्हणून उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी दया दाखवू नये. अश्लीलतेविषयीचा कायदा स्त्री-पुरुष यांच्यासाठी समान आहे. इस्लाम धर्मामध्ये एकीकडे बुरखावाद चालू असतांना दुसरीकडे मुसलमान स्त्रीने अश्लीलता दाखवून अर्धनग्न रहाणे, हे इस्लामच्या धर्मगुरूंना दिसत नाही का ?