हिंदूंची भूमी बळकावणार्या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !
मुंबई – तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य पंथीय यांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) केला जात आहे. परिणामी रेल्वे, संरक्षणदल यांच्या नंतर देशभरात ८ लाख एकरपेक्षा अधिक भूमीची ‘वक्फ बोर्ड’ मालक झाली आहे. काँग्रेसने मुसलमानांना दिलेली शक्ती वा हा कायदेशीर अधिकार हिंदु, ख्रिस्ती वा अन्य कोणत्याही पंथाकडे नाही. या भेदभावपूर्ण कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन या कायद्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे आणि हा कायदा पालटण्यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे, असे आवाहन ‘वक्फ बोर्ड कायद्या’चे अभ्यासक तथा काशी येथील ज्ञानवापीच्या मुक्तीसाठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.
तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेथुरई हे पूर्ण गावच वक्फ बोर्डची संपत्ती म्हणून घोषित झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यावर हिंदु जनजागृती समितीने ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात ते बोलत होते.
वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस
तमिळनाडूतील तिरुचेथुरई गावातील २ सहस्र वर्षांपूर्वीचे हिंदूंचे श्री चंद्रशेखर स्वामी यांचे मंदिर हे वक्फ बोर्डाची संपत्ती कशी काय होऊ शकते ? संसदेद्वारे लँड जिहादसाठी केलेल्या कायद्यामुळे हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि मंदिरही सुरक्षित नाही. वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे हिंदूंची अवस्था बिकट झाली आहे.
हिंदू संघटित न झाल्यास औरंगजेबाचा काळ पुन्हा येण्याची शक्यता ! – नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकांनद कार्य समिती
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले होते की, भारतातील साधन-संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. त्याचीच कार्यवाही या कायद्याद्वारे केली जात आहे. हिंदू दिवसेंदिवस या कायद्याच्या सापळ्यात खोलवर अडकत चालला आहे. हिंदु आताच संघटित झाले नाहीत, तर आपण पुन्हा औरंगजेबाच्या काळात जाऊ !
लँड जिहादला प्रोत्साहन देणारा कायदा रहित होण्यासाठी हिंदूंनी लढा द्यायला हवा ! – नरेंद्र सुर्वे, देहली राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
एकीकडे हिंदूंची मोठी मंदिरे आणि संपत्ती सरकारने स्वत:कडे घेतली आहे, तर दुसरीकडे मुसलमानांचे धार्मिक स्थळ वा संपत्ती यांना हात लावण्याऐवजी त्यांना संरक्षित करण्यासाठी वक्फ बोर्ड कायदा केला आहे. हे हिंदूंसमवेत केलेले छळकपट आहे. लँड जिहादसाठी अर्थात् भूमी हडपण्यासाठी कायद्याद्वारे एक समांतर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. हा कायदा म्हणजे एक प्रकारे मुसलमानांना दिलेले हत्यार आहे. लँड जिहादसाठी प्रोत्साहन देणारा हा कायदा रहित होण्यासाठी हिंदूंनी लढा दिला पाहिजे.