१ लाख रुपयांची लाच घेतांना पनवेल येथील पोलीस निरीक्षकाला अटक !
पनवेल – पोलीस कर्मचार्याचे इच्छित स्थळी स्थानांतर करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना पोलीस निरीक्षक रामचंद्र वारे यांना अटक करण्यात आली आहे. वारे हे महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागात कार्यरत आहेत. ही कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० सप्टेंबर या दिवशी केली.
वारे यांनी पोलीस दलातील २ कर्मचार्यांचे इच्छित स्थळी स्थानांतर करण्यासाठी १ लाख रुपयाची मागणी केली होती. या कर्मचार्यांनी पालघर लाचलुचपत विभागाकडे या विषयी तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी वारे यांच्या कार्यालयात सापळा रचला होता. या पोलीस कर्मचार्यांकडून लाचेची रक्कम स्वीकारतांना वारे यांना रंगेहात अटक केली.
संपादकीय भूमिकालाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल ! |