मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
मुलीला विवस्त्र करून रस्त्यावर धावण्यास भाग पाडले !
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे काही वासनांध धर्मांधांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण समोर आले आहे. भोजपूरच्या इस्लामनगर येथीलल काही धर्मांधांनी एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिला जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतरही या वासनांधांची वासना शमली नाही. या बलात्कार्यांनी त्या निष्पाप अल्पवयीन मुलीला विवस्र अवस्थेत रस्त्यावर धावण्यास भाग पाडले. ती विवस्र मुलगी ओरडत रस्त्यावर धावत असतांनाही बलात्कारी नौशे अली, इमरान आदींनी तिची छेड काढणे चालू ठेवले. मन हेलावून टाकणारा याविषयीचा व्हिडिओ ट्विटरवर प्रसारित झाला आहे.
Minor girl gang-raped, forced to run back home naked in UP; police file FIR after video goes viral #news #dailyhunt https://t.co/lK8eW3xmbO
— Dailyhunt (@DailyhuntApp) September 22, 2022
या प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मुरादाबाद पोलिसांनी वासनांधांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी नौशे अली याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. यातून वासनांध धर्मांधांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते ! |