हिंदु राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर आक्रमणप्रकरणी ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई !
पुणे – हिंदु राष्ट्र संघटनेचे तुषार हंबीर हे गेल्या अनेक वर्षांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे निमित्त करत २ ते ३ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र गोळीबार चुकल्याने आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
तुषार हंबीरे यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ८ आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता जुन्या प्रकरणाच्या रागातून हे आक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे.