श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी महालय श्राद्ध करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘१७.९.२०२० या दिवशी सर्वपित्री अमावास्या असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सावईवेरे येथील घरी महालय श्राद्ध होते. मला ते श्राद्धविधी करण्याची संधी मिळाली होती.
१. मला सर्वपित्री अमावास्येच्या ४ दिवस आधी ही सेवा करण्यासंबंधी भ्रमणभाष आला होता. त्या दिवसापासूनच ‘सर्वत्र आनंदच भरला आहे’, असे मला जाणवत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी सेवेसाठी जातांना मला मार्गात पांढरा श्वान (कुत्रा) दिसला आणि त्यांच्या घरून परत येतांनाही तोच कुत्रा दिसला.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी गेल्यावर ‘त्यांच्या दर्शनाने माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले’, असे मला जाणवले. विधीला आरंभ झाल्यापासून विधी पूर्ण होईपर्यंत मला पुष्कळ उत्साह जाणवत होता.
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अस्तित्वाने त्यांच्या घरातील वातावरण आनंदी आहे’, असे मला वाटत होते. माझ्याकडून संपूर्ण सेवा एकाग्रचित्ताने होत होती.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा असूनही त्या घरातील सर्व सेवा सहजतेने करत होत्या. त्यांनी ‘पिंड कसे करायचे ?’, याविषयी विचारून घेऊन त्याप्रमाणे पिंड बनवले.
६. मी विधी करतांना वेळ मिळेल, त्याप्रमाणे विधीचे महत्त्व सांगत होतो. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि घरातील अन्य सदस्य माझे बोलणे ऐकत होते. तेव्हा ‘माझ्या मुखातून गुरुमाऊली बोलत आहे’, असे मला जाणवत होते.
७. श्राद्धविधी पूर्ण झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्या ठिकाणचे आवरले. तेव्हा त्यांना सेवा करतांना पाहून माझा भाव दाटून येत होता.
‘गुरुदेव, मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी सेवा करायची संधी मिळाली’, हे आपलेच नियोजन होते. मी गुरुमाऊली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो अन् हे लिखाण त्यांच्या चरणी अर्पण करतो.’
– श्री. पवन बर्वे, वाळपई, सत्तरी, गोवा. (२०.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |