वेठबिगारीसाठी नेऊन भिवंडी येथील अल्पवयीन मुलांना राबवणार्या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद !
अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !
ठाणे, २१ सप्टेंबर (वार्ता.) – नाशिक, नगर या भागांत भिवंडी येथील लहान बालकांना मेंढ्या राखण्यासाठी त्यांच्या पालकांना कवडीमोल पैसे देऊन मेंढपाळ घेऊन गेले होते. त्यांना वेठबिगारीसाठी नेऊन राबवले जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणांमध्ये श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा करून राहुल पवार (वय १७ वर्षे) आणि अरुण वाघे (वय १२ वर्षे) या वेठबिगार बालकामगारांची सुटका केली आहे. त्यांना वेठबिगारीसाठी घेऊन जाणार्या दोघांच्या विरोधात भिवंडी येथील पडघा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.