अमेरिकेत चारित्र्यहीन मुली सामान्य (नॉर्मल), तर चारित्र्यसंपन्न मुली असामान्य (ॲबनॉर्मल) !
‘अमेरिकेतील आमच्या कार्यालयात वर्षातून एकदा कर्मचार्यांसाठी विनामूल्य पूर्ण शारीरिक चाचण्या करता येत असत. भारतात परत जाण्यापूर्वी त्याचा लाभ घ्यावा; म्हणून मी एका चांगल्या रुग्णालयात गेले. मला आवश्यक वाटलेल्या चाचण्या मी रुग्णालयाच्या कागदावर निवडल्या आणि तेथील महिला आधुनिक वैद्यांना भेटले.
१. अमेरिकेत मुलींना ‘बॉयफ्रेंड’ असणे, हा सर्वसामान्य समज असल्याने डॉक्टरांनी करायला लावलेल्या चाचण्या
मी लग्न झालेल्या महिलांच्या संदर्भातील काही चाचण्या न करण्याचे ठरवल्यावर तेथील आधुनिक वैद्या मला म्हणाल्या, ‘‘तुझे लग्न झाले नसले, तरी तुला जवळचा मित्र (‘बॉयफ्रेंड’) असेलच ना ?’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘मला कुणीही जवळचा मित्र नाही. मी एकटीच आहे. मला त्या चाचण्यांची आवश्यकता नाही.’’ त्यांना ते पटत नसल्यामुळे त्या आधुनिक वैद्या मला म्हणाल्या, ‘‘इथे तुझ्या वयाच्या मुलींना जवळचा मित्र असतोच. तुला या चाचण्या करणे आवश्यकच आहे.’’ शेवटी मी म्हणाले, ‘‘मला जवळचा मित्र नाही. आमच्या हिंदु धर्मात लग्नाआधी मुली ‘कुमारी’ असतात. मी ‘स्पिरीच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) मार्गदर्शनानुसार साधना करते. तुम्ही सांगत असलेल्या चाचण्या करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.’’ मी त्यांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’, हिंदु धर्म आणि साधना यांविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न करून मला आवश्यक तेवढ्याच चाचण्या केल्या.
२. अमेरिकेत चारित्र्यवान महिलेस ‘असामान्य’ संबोधन !
काही दिवसांनी मी माझ्या चाचण्यांचा अहवाल घेण्यासाठी रुग्णालयात गेले. तेव्हा त्या आधुनिक वैद्यांनी त्या अहवालावर माझ्याविषयी ‘असामान्य’ (ॲबनॉर्मल) असे लिहिले होते. मी ते वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. अमेरिकेत सुसंस्कृत आणि चारित्र्यवान महिलेस ‘असामान्य’ संबोधले जाते. ‘स्त्रीचे चारित्र्य आणि शील यांचा सन्मान करणारा भारत देश आणि हिंदु धर्म श्रेष्ठ आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी भारतात परत जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे’, अशी माझी निश्चिती झाली.’
– एक साधिका (१५.१२.२०२१)