बदलापूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर आक्रमण !
असुरक्षित बदलापूर शहर !
ठाणे, २१ सप्टेंबर (वार्ता.) – बदलापूर शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर २० सप्टेंबरच्या रात्री ५ जणांनी बंदुकीचा धाक दाखवत आक्रमण केले. त्यात मोरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे सांगितले जात असून या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.