गुरुवायूर मंदिर समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मागितले केरळ सरकारकडे उत्तर !
गुरुवायूर मंदिराच्या निधीचा गैरवापर केल्याचे प्रकरण
नवी देहली – केरळमधील श्री गुरुवायूर मंदिराच्या निधीच्या सूत्रावरील केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार्या गुरुवायूर देवस्वम् व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकार आणि इतर संबंधित यांना १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध मंदिराची सर्व मालमत्ता मंदिराच्या मुख्य देवतेकडे निहित आहे आणि त्या निधीचा वापर करण्याचा अधिकार त्याच्या व्यवस्थापनाला नाही’, असे केरळ उच्च न्यायालयाने वर्ष २०२० मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले होते. गुरुवायूर देवस्वम् व्यवस्थापन समितीने राज्यातील पूरग्रस्तांसाठी ‘मुख्यमंत्री आपत्ती साहाय्य निधी’मध्ये १० कोटी रुपये आणि कोविड-१९ साथीच्या आजाराशी लढण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्यानंतर हा वाद चालू झाला होता.