जे.एन्.पी.टी. बंदरातून २० सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

देहली पोलिसांची माहिती

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – येथील जे.एन्.पी.टी. बंदरातून २० सहस्र किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात १ सहस्र ७२५ कोटी रुपये इतके आहे. देहली पोलिसांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी मुस्फा स्टानिकझाई आणि रहिमुल्ला रहिमी या अफगाणी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ३१२ किलो अमली पदार्थ पकडले होते. त्यानंतर नवी मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविषयी माहिती मिळाली होती.

संपादकीय भूमिका

इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यात येतो आणि सुरक्षा यंत्रणांना त्याविषयीची माहिती कशी मिळत नाही ?