आचार्य धर्मेंद्र यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली !
मुंबई – ‘जयपूर येथील रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्रजी यांच्या स्वर्गवासाने हिंदु समाजाला नवीन दिशा देणारा प्रखर धर्माचार्य आपण गमावला आहे’, अशी भावना सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे आचार्य धर्मेंद्र हे प्रमुख नेते होते. ‘प्रखर हिंदुत्ववादी’ अशी त्यांची ओळख होती. श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी त्यांनी पूर्ण देश पिंजून काढला होता. हिंदु समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. मठाचे प्रमुख असल्याने त्यांचे महाराष्ट्राशी भावुक नाते होते. श्रीराम त्यांना सद्गती देवो. मी त्यांचे कुटुंबीय आणि अनुयायी यांच्या दुःखात सहभागी आहे.