कुतूबमिनार येथे पूजा करण्याच्या मागणीवर १९ ऑक्टोबरला सुनावणी
नवी देहली – येथील साकेत न्यायालयाने कुतूबमिनारवर दावा सांगणारे याचिकाकर्ते कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांचे म्हणणे होते की, ते तोमर राजपरिवाराचे वंशज आहेत. या राजपरिवाराचे येथे पूर्वी शासन होते. या प्रकरणातील मुख्य याचिकेवर येत्या १९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या याचिकेनुसार जैन तीर्थंकर ऋषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या वतीने अधिवक्ता पू. हरि शंकर जैन अन् रंजना अग्निहोत्री यांनी कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे. या परिसरात हिंदु आणि जैन यांची २७ मंदिरे होती. आता तेथे देवतांच्या काही मूर्ती आहेत. या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.