अंतरात भाव दे ।
अंतरात भाव दे । भक्तीचे हे दान दे ।
गुरुचरणांचा देवा । एक मज ध्यास असू दे ।। १ ।।
नेत्री तुझे रूप असू दे । मुखी तुझे नाम असू दे ।
चित्ती माझ्या अखंड । स्मरण तुझे असू दे ।। २ ।।
मायामोही त्याग दे । संतसंग मिळू दे ।
हृदयात माझ्या देवा । नित्य तुझा वास असू दे ।। ३ ।।
मन माझे धाव घेई । चरणी तुझ्या ठाव दे ।
शरण तुला आले देवा । मुक्तीचा हा हात दे ।। ४ ।।
– श्रीमती मेघना वाघमारे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |