स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत असतांना तन, मन आणि बुद्धी यांचे समर्पण होत असल्याने ही प्रकिया करण्यासाठी प्रयत्नरत रहाणे, ही ‘साधना’ असणे
‘सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. मनाचे समर्पण : आपल्या मनातील प्रत्येक अयोग्य विचार सारणीत लिहून त्यावर मनाला योग्य दृष्टीकोन दिला पाहिजे. याने मनाचे समर्पण होते.
२. तनाचे समर्पण : स्वयंसूचनेत दिलेला दृष्टीकोन कृतीत आणला की, देहाचे समर्पण होते.
३. बुद्धीचे समर्पण : ‘वरील दोन्ही प्रक्रियेत आणखी काय प्रयत्न करू ?’, याचे चिंतन केल्यास किंवा करत राहिल्यास बुद्धीचे समर्पण होते.
हे प्रयत्न चिकाटीने, सातत्याने आणि तळमळीने केले पाहिजेत. त्यासाठी दिवसभर प्रयत्नरत आणि कृतीशील रहाणे, म्हणजेच साधना आहे.’
– कु. वेदिका दहातोंडे (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२१)