भक्तीसत्संग ऐकतांना ‘स्वतःच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे अनुभवणे आणि भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. भक्तीसत्संग ऐकतांना ‘स्वतःचे पाय परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण आहेत’, असे जाणवणे
‘१६.१२.२०२१ या दिवशी दुपारी मी भक्तीसत्संग ऐकत होते. त्या वेळी मी आसंदीत खाली पाय सोडून बसले होते. तेव्हा मी अधूनमधून माझे पाय आणि पावले यांच्याकडे पहात होते. तेव्हा मला ‘माझे पाय परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण आहेत’, असे जाणवले.
२. स्वतःच्या ठिकाणी ‘परात्पर गुरुदेव बसले आहेत’, असे जाणवणे आणि भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त करणे
‘माझ्या ठिकाणी परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) बसले आहेत’, असे मला अंतर्मनातून वाटत होते. मी स्थूलदेहाने महानंदा पाटील होते आणि आतून परात्पर गुरुदेव होते. गुरुदेव दोन्ही हात जोडून बसले होते. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांचा राज्याभिषेक चालू आहे’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे पाहून माझा भाव जागृत झाला आणि कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांत अश्रू आले. तेव्हा माझे मन निर्विचार होते. माझ्या गालावरून ओघळलेले अश्रू मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण केले. माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्याव्यतिरिक्त अन्य काहीच नव्हते.
श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी नतमस्तक होऊन कृतज्ञ आहे.’
– रामाची दासी,
सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |