५ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील ३१ सरकारी ग्रंथालये बंद पडली !
नागपूर – ‘वाचनाची गोडी लागावी’, हे ध्येय असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने ‘गाव तिथे वाचनालय’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले; परंतु त्यालाच घरघर लागली आहे. वर्ष २०१७ ते २०२२ या ५ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील अनुमाने ३१ सरकारी ग्रंथालये बंद पडली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंबंधीची माहिती मागवली होती.
‘ग्रामीण भागांत नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळावी आणि ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करावी’, अशा मागणीचे ठराव ग्रंथालय संघटनांच्या अधिवेशनात संमत केले जातात. ग्रंथालय चळवळ सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रंथालये वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते; परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ग्रंथालये बंद होत आहे, असे वास्तव पुढे आले आहे.