पितृतर्पण का आणि कसे करावे ?
#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
माता-पित्यांचा मृत्यू झाल्यावरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. काल तर्पण का आणि कसे करावे ? अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र, हे आपण जाणून घेतले. आज पितृतर्पणासंदर्भातील अध्यात्मशास्त्रीय माहिती पाहूया.
१. व्याख्या
पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे.
२. का करावे ?
पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते.
३. महत्त्व
तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश आणि अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचवण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्त करतात.
४. कधी करावे ?
अ. देव, ऋषि आणि पितर यांना उद्देशून नित्य (दर दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी दररोज श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे.
आ. पार्वण श्राद्ध केल्यानंतर दुसर्या दिवशी पितृतर्पण करावे.
५. तीलतर्पण
पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळाचे काळे आणि पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे. तीळ न मिळाल्यास त्याच्या ऐवजी सोने किंवा रूपे वापरावे.
अ. तीळमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात.
आ. जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते.
इ. दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात.
ई. नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.
६. तीलतर्पणाचे महत्त्व
अ. पितरांना तीळ प्रिय आहेत.
आ. तिळाचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करत नाहीत.
इ. श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे, निमंत्रित ब्राह्मणांना तीळमिश्रित जल द्यावे आणि तिळाचे दान द्यावे.
– जैमिनीयगृह्यसूत्र (उत्तरभाग, खंड १), बौधायनधर्मसूत्र (प्रश्न २, अध्याय ८, सूत्र ८) आणि बौधायनगृह्यसूत्र
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English