झवेरी बाजार येथे बाँब ठेवल्याची धमकी देणार्याला अटक !
मुंबई – झवेरी बाजार आणि नगर येथे बाँब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिनेश सुतार याला अटक केली आहे. सुतार याने १८ सप्टेंबर या दिवशी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर दूरभाष केला होता. त्यात ‘अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील नानज आणि मुंबईतील झवेरी बाजार येथील खाऊ गल्ली येथे बाँब ठेवले आहेत’, असे त्याने सांगितले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अन्वेषण करून पोलिसांनी सुतार याला अटक केली. तो सांगली येथील सांगोला तालुक्यातील रहिवासी आहे.