बीजामृताचे महत्त्व
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘नैसर्गिक शेतीच्या ४ प्रमुख स्तंभांपैकी ‘बीजामृत’ एक आहे. देशी गाईचे शेण, गोमूत्र आणि खाण्याचा चुना यांपासून ‘बीजामृत’ बनवले जाते. बियाणे पेरण्यापूर्वी किंवा सिद्ध झालेले (तयार) रोप मातीत लावण्यापूर्वी त्याच्यावर बिजामृताचा संस्कार करतात. याच्या वापरामुळे रोपांचे मातीतून पसरणार्या रोगांपासून रक्षण होते. बिजामृताचा संस्कार केल्याने उगवण रोखणारी रासायनिक संयुगे निष्क्रीय होतात आणि उगवण क्षमता वाढते. विविध घातक बुरशींचे नियंत्रण करणारी ‘मित्र बुरशी’ बिजामृतामध्ये असते. सुदृढ रोपांच्या निर्मितीसाठी ‘बीजसंस्कार’ करणे आवश्यक आहे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.८.२०२२)
__________________________________
बिजामृताच्या सविस्तर माहितीसाठी सनातनच्या संकेतस्थळाची मार्गिका
https://www.sanatan.org/mr/a/82985.html
______________________