‘एन्.आय.ए.’ने न्यायालयाकडे आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी मागितला वेळ !
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण
मुंबई – अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे हत्या प्रकरणी १९ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विशेष न्यायालयाकडे आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. अन्वेषणाला वेळ लागत असल्याचे कारण देत वेळ मागण्यात आला. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यानंतर ८ धर्मांधांनी उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या केली होती.