जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक ! – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप
आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन !
कोल्हापूर, १९ सप्टेंबर (वार्ता.) – टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असल्यानेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने कट रचून अटक केली. एकूणच तेलंगाणा सरकारची कृती ही पक्षपाती आहे. त्यामुळे केंद्रीय गृह विभागाने यामध्ये लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, तसेच त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी यांनी केली. ते १९ सप्टेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात बोलत होते. या प्रसंगी शिवशाही फाऊंडेशनचे श्री. सुनील सामंत, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ श्री. कृष्णात पवार, हिंदू महासभेचे श्री. मनोहर सोरप आणि श्री. जयवंत निर्मळ, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, धर्मप्रेमी सर्वश्री संदीप चौगुले, किरण हंगे, बंडा पाटील, अभय शिंदे उपस्थित होते.
गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात निवेदनयाच मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन अव्वल कारकून शिवाजी भोसले यांनी स्वीकारले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर कुराडे, श्री. मनोज पवार, भाजपचे श्री. संदीप नाथ बुवा, भाजप जिल्हाउपाध्यक्ष श्री. मारुति राक्षे, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री राहुल खोत, सचिन प्रसादे, सतीश मगदूम, सतीश डोमणे यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. |