ट्विटर ‘ट्रेंड’द्वारे वक्फ कायदा रहित करण्याची मागणी

  • वक्फ बोर्डाद्वारे देशामध्ये लँड जिहाद !

  • राष्ट्रीय स्तरावर ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – तमिळनाडू राज्यातील हिंदु बहुसंख्य असणार्‍या एका गावाची संपूर्ण भूमीच वक्फ बोर्डाच्या नावावर असल्याचे उघड झाले. वर्ष १९९५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या नवीन वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराद्वारेच या गावातील भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली आहे. देशात भारतीय सैन्य आणि रेल्वे प्रशासन यांच्यानंतर वक्फ बोर्डाकडेच सर्वाधिक भूमी आहे. वर्ष २००९ मध्ये वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकर भूमी होती. आज ती दुप्पट म्हणजे ८ लाख एकर  झाली आहे. यामुळेच ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १९ सप्टेंबर या दिवशी #Remove_Waqf_Act हा हॅशटग ट्रेंड (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला होता. तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता. यावर ४० सहस्रांहून अधिक ट्वीट् करण्यात आले होते. याद्वारे नागरिकांनी वक्फ कायदा रहित करण्याची मागणी केली आहे.