पाकमध्ये शिया मुसलमानांच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमान जमावाचे आक्रमण
मशिदीसमोरून मिरवणूक नेण्यात आल्याने विरोध !
सियालकोट (पाकिस्तान) – पाकमध्ये शिया मुसलमानांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. १७ सप्टेंबर या दिवशी सियालकोट येथे शिया मुसलमानांची धार्मिक मिरवणूक जात असतांना तिच्यावर पिस्तूल, दगड आदींद्वारे मुसलमानांच्या एका जमावाने आक्रमण केले. यात १३ हून अधिक जण घायाळ झाले. यात काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पाकमध्ये सामाजिक माध्यमांवरून या आक्रमणाचा निषेध केला जात आहे. या आक्रमणात हात असणार्या ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’वर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
पाकिस्तान में ‘मातम’ मना रहे शिया मुसलमानों पर हमला! सड़क पर पिस्तौल और पत्थर लेकर निकले TLP के कट्टरपंथी, सामने आया VIDEO#Pakistan #ShiaMuslimshttps://t.co/Eo1YkDZdjt
— India TV Hindi (@IndiaTVHindi) September 19, 2022
पोलिसांनी सांगितले की, मिरवणुकीच्या मार्गावर ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ ही संघटना आणि शिया मुसलमान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव चालू होता. या संघटनेचे म्हणणे होते, ‘ही मिरवणूक आमच्या मशिदीसमोरून जाऊ नये’, तर शिया मुसलमानांचे म्हणणे होते, ‘आमची मिरवणूक नेहमी याच मार्गाने जाते.’ या प्रकरणी दोघांमध्ये चर्चा घडवून आणल्यानंतर ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने मान्य केले होते की, ते या मिरवणुकीवर कोणताही आक्षेप घेणार नाही. तरीही त्या दिवशी यावर आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी ३० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे; मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिका
|