अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि मदरसे उडवण्याचे विधान केल्यावरून यति नरसिंहानंद यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी हरिद्वार येथील धर्मसंसदेत आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
महामंडलेश्वर यति नरसिंहानंद ने एक बार फिर विवादित बयान दिया है.
— AajTak (@aajtak) September 19, 2022
१८ सप्टेंबर या दिवशी अलीगड येथे हिंदु महासभेच्या एका कार्यक्रमात उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांच्या करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाविषयी बोलतांना यति नरसिंहानंद म्हणाले, ‘‘मदरशासारखी संस्था असूच नये. चीनप्रमाणेच सर्व मदरसे दारूगोळ्यांच्या साहाय्याने उडवून दिले पाहिजेत. मदरशांतील सर्व विद्यार्थ्यांना ‘डिटेंशन सेंटर’(अटक केलेल्यांना एकत्रित ठेवणारे केंद्र) मध्ये पाठवले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मेंदूतून कट्टरतावाद काढला जाईल. मदरशांप्रमाणेच अलीगड मुस्लिम विद्यापीठही बाँबने उडवून तेथील विद्यार्थ्यांना केंद्रामध्ये पाठवून त्यांच्या मेंदूवर उपचार केले जावेत.