गुजरातच्या मुंद्रा बंदरातून ४८ कोटी रुपयांच्या ई-सिगरेट जप्त

ई सिगारेट म्हणजे काय ?

ई-सिगारेट किंवा ‘बाष्पयुक्त सिगारेट’ हे बॅटरीवर चालणारे उपकरण आहे. सिगारेटला पर्याय म्हणून ‘ई सिगारेट’कडे पाहिले जाते. ई सिगारेटद्वारे निर्माण झालेली वाफ श्‍वासावाटे शरिरात गेल्यावर तंबाखूच्या धुरासारखीच चव आणि शारीरिक संवेदना संबंधित व्यक्तीला मिळते.

मुंद्रा (गुजरात) – महसूल विभागाच्या गुप्तचर पथकाने येथील मुंद्रा बंदरात धाड टाकून ४८ कोटी रुपयांच्या ‘ई-सिगरेट’ जप्त केल्या. ई सिगरेटची येथे तस्करी होणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही धाड टाकली होती. एका कंटनेरमधून लादी पुसण्याचे ‘मॉप्स’ मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती; मात्र प्रत्यक्षात या कंटेनरमधील काही खोक्यांमध्ये ई-सिगरेट आढळून आले. यात एकूण २ लाख ई-सिगरेट सापडल्या. या ई-सिगरेट चीनमध्ये बनवण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

यापूर्वीही या बंदरामध्ये कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थ सापडले होते. अशा बंदरावर आता नेहमीच कडेकोट तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !