धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या २०० मीटरच्या परिसरात बांधकाम नाही !

पुणे – जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूला २०० मीटरच्या परिसरात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. याची कार्यवाही जलसंपदा विभागाने चालू केली असून धरणाच्या परिसरात अनधिकृत अथवा अनुमती घेऊन फार्महाऊस अथवा कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यावर नियंत्रण आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली.