‘लागवड करणे कसे शक्य आहे’, याचे मार्ग शोधा !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘बर्याच जणांचे असे म्हणणे असते, भाजीपाला पिकवण्यासाठी आमच्या घराच्या आजूबाजूला जागा नाही. काही ठिकाणी इमारतीच्या छतावर लागवड करण्याची अनुमतीही मिळत नाही; परंतु अगदी १ – २ फूट रुंद आणि ५ – ६ फूट लांब अशा खिडकीतही भाजीपाला पिकवता येतो. काही ठिकाणी घराभोवती फरशा बसवल्यामुळे माती नसते; परंतु तिथेही वाफे (विटांचे कप्पे) बनवून लागवड करता येते. अट केवळ एकच की, तिथे न्यूनतम ४ घंटे तरी ऊन यायला हवे. तळमळ असेल, तर मार्ग मिळतोच ! ती जागृत ठेवा आणि ‘घरच्या घरी लागवड कशी करता येईल’, याचे मार्ग शोधा !’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.८.२०२२)