पुणे येथे ‘सेक्स तंत्र’ शिबिराचे आयोजक रवि सिंह यांच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
पुणे – ‘सत्यम शिवम सुंदरम् फाऊंडेशन’चे संस्थापक रवि सिंह याने १५ सप्टेंबर आणि त्याअगोदर ‘सेक्स तंत्र’ या नावाने विज्ञापन सिद्ध करून समाजमाध्यमांवर प्रसारित केले. विज्ञापनामध्ये स्त्री आणि पुरुष यांचे अश्लील छायाचित्र छापून त्याचे जाहीर प्रदर्शन, तसेच प्रसारण केले आहे. या प्रकरणी पुण्ो येथील सायबर पोलीस ठाण्यात संबंधित आयोजकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील महिला पोलीस कर्मचारी मनिषा पुकाळे यांनी तक्रार दिली आहे.
तत्पूर्वी संस्थेचा प्रमुख रवि सिंह याने पोलिसांशी संपर्क साधून शिबिराविषयी प्रसारित झालेली चुकीची माहिती आणि त्यास होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रहित केल्याचे सांगत सारवासारव केली.