दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
मुंबई – शिवसेनेतून फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या. सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
१७ सप्टेंबर या दिवशी शिवसेना भवन येथे विभागप्रमुख आणि उपविभागीय प्रमुख यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी वरील आवाहन केले.