अडीच वर्षांत कोणकोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गेले, याविषयी वेळ आल्यावर बोलीन ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हैदराबाद मुक्तीसंग्रामदिनाच्या निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण !
संभाजीनगर – महाविकास आघाडी सरकार असतांना अडीच वर्षांमध्ये किती उद्योगांना विरोध झाला ? किती उद्योग गेले ? याविषयी माझ्याकडे माहिती आहे. कोणकोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गेले, हे योग्य वेळ आल्यावर मी बोलीन. कोणताही प्रकल्प हा १-२ मासांत जात नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वेदांता’वरून राजकारण करणार्यांवर केली आहे. १७ सप्टेंबर या दिवशी हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौर्यावर होते. त्यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते भाग्यनगर (हैद्राबाद) येथे रवाना झाले. भाग्यनगर येथे प्रथमच मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना वरील विधान केले.