ठाणे येथे भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणा !
ठाणे, १७ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे रेल्वेस्थानक परिसरात १७ सप्टेंबर या दिवशी ‘शिंदे-फडणवीस साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली, तर ‘५० खोके एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने ठाणे येथील शिवसेनेच्या वतीने रेल्वेस्थानक परिसरात सरकार विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, तर त्याच वेळी ठाणे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त मोदींनी केलेल्या विकासकामांच्या स्थानक परिसरातील फलकाचे अनावरण करण्यात आले.