आता पाकला मित्रराष्ट्रेही भिकारी समजू लागले आहेत !
पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची स्पष्टोक्ती !
समरकंद (उझबेकिस्तान) – आता मित्रराष्ट्रेही पाकिस्तानकडे ‘सातत्याने पैशांची भीक मागणारा देश’ या दृष्टीने पहायला लागले आहेत. छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थांनीही पाकिस्तानला मागे टाकले आहे आणि आपण गेल्या ७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरत आहोत, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे. ‘द डॉन’ या वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान शरीफ पुढे म्हणाले की, आज आम्ही कोणत्याही मित्र देशांकडे जातो किंवा त्यांना दूरभाष करतो, तेव्हा त्यांना वाटते की, आम्ही पैसे मागायला आलो आहोत. सध्या देशाची अर्थव्यवस्था आव्हानात्मक बनली आहे. आता पुरामुळे स्थिती आणखी बिकट झाली आहे.
संपादकीय भूमिकाही परिस्थिती का निर्माण झाली आहे ?, याचा शरीफ अंतर्मुख होऊन विचार करतील का आणि त्या स्थितीवर उपाय काढतील का ? हाच प्रश्न आहे ! पाकिस्तानकडे केवळ भिकारी देशच नाही, तर ‘आतंकवादी देश’ म्हणूनही जग पहात आहे, हेही शरीफ यांनी सांगायला हवे ! |