वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला भीषण आग !

४ जनावरांचा होरपळून मृत्यू !

वर्धा – जिल्ह्यातील रेणकापूर येथील शेतकरी आत्माराम निखाडे यांच्या घराजवळील गोठ्याला १५ सप्टेंबर या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत गोठ्यात असलेल्या ५ जनावरांपैकी ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एक बैल गंभीर घायाळ झाला आहे. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश न आल्याने अग्नीशमनदलाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत शेतकर्‍याची अनुमाने १० लाख रुपयांची हानी झाली आहे. आग विझवतांना शेतकरी आत्माराम निखाडे आणि मुलगा आशिष निखाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे.