डोंबिवली येथे दुचाकी चोरणारा धर्मांध अटकेत !
१० दुचाकी आणि १ सायकल जप्त
ठाणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – डोंबिवली शहर परिसरात गेल्या काही मासांपासून दुचाकी आणि सायकल यांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी डोंबिवली येथील विविध पोलीस ठाण्यांत वाहन मालकांकडून तक्रार प्रविष्ट करून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दुचाकी चोरांच्या शोधासाठी विशेष अन्वेषण पथक सिद्ध करण्यात आले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून आरोपी महंमद इसाक युनुस खान (वय ५४ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ लाख ५० सहस्र रुपये किंमतीच्या १० दुचाकी आणि १ सायकल पोलिसांनी जप्त केली आहे. (अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)