फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्याविषयी कर सवलती दिल्याचा कागदोपत्री पुरावा दाखवा ! – अधिवक्ता आशिष शेलार, भाजप
मुंबई, १५ सप्टेंबर (वार्ता.) – ज्या जलदगतीने आघाडी सरकारने विदेशी मद्याला कर सवलती दिल्या, त्याच जलदगतीने ‘फॉक्सकॉन आणि वेदांता’ प्रकल्प महाराष्ट्रात यावा; म्हणून कर सवलती दिल्याचा कागदोपत्री एखादा पुरावा दाखवा, असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी १५ सप्टेंबर या दिवशी वांद्रे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. या प्रकरणी ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची ‘पेंग्विन सेना’ भ्रम निर्माण करून मराठी माणसाशी थापेबाजी अन् गुजराती माणसाविषयी शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.