१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !
गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !
मुंबई – महाराष्ट्रातील समस्त हिंदु बांधवांनी १८ सप्टेंबर या दिवशी ‘गडदुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे’, या मागणीसाठी भव्य आंदोलनाची हाक दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हे आंदोलन होणार आहे. सकाळी ९.४५ वाजता सामूहिक शिववंदना होईल. तेथून आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा निघेल. आझाद मैदानात आंदोलनाची सूत्रे मांडण्यात येतील. या वेळी भगवी टोपी घालून आणि गडदुर्गांसंबंधित फलक हातात घेऊन समस्त हिंदूंनी या आंदोलनाला उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.