अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – अंबरनाथ येथील सुभाषवाडी परिसरात रहाणार्‍या ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिचे दागिने लुटण्यात आले. हा प्रकार १४ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८.३० वाजता घडला. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. अंबरनाथ पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (रस्त्यावर किंवा घरात घुसून महिलांचे दागिणे चोरणार्‍या गुन्हेगारांवर पोलीस वचक कधी निर्माण करणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

असुरक्षित अंबरनाथ शहर !