कुतूबमिनारच्या स्वामित्वाचा अधिकार मिळण्यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीवर उद्या होणार निर्णय !
देहली – कुतूबमिनारवर स्वामित्वाचा अधिकार सांगणार्या याचिकेवर देहलीतील साकेत न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्ते महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांनी कुतूबमिनारवर अधिकार सांगण्याच्या याचिकेवर सुनावणी करावी कि नाही, यावर १७ सप्टेंबर या दिवशी निर्णय देऊ. याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता शर्मा यांनी सांगितले की, वर्ष १९४७ मध्ये आमच्याकडून कोणतीच अनुमती न घेता कुतूबमिनारवर सरकारने नियंत्रण मिळवले होते. आमचे पूर्वज याचे वारसदार होते.
कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मिळण्याची मागणी करणार्या याचिकांमध्ये महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांना पक्षकार बनायचे आहे, असेही त्यांचे अधिवक्ता शर्मा यांनी या वेळी स्पष्ट केले.