जनावरांचे मांस विक्री केल्याप्रकरणी मदिना आणि बिस्मिल्ला या उपाहारगृहांवर कारवाई !
सातारा, १५ सप्टेंबर (वार्ता.) – येथील सदरबझार परिसरातील मदिना आणि बिस्मिल्ला या उपाहारगृहांत जनावरांचे मांस विक्री केले जात आहे. अशी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने केल्यानंतर सातारा नगरपालिकेने धडक कारवाई करत दोन्ही उपाहारगृह ‘सील’ केले आहेत. सदरबझार परिसरात या उपाहारगृहामध्ये जनावरांचे मांस विक्री करण्याचा उद्योग राजरोसपणे चालू होता. याविषयी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर पालिकेच्या भरारी पथकाने थेट कारवाई केली. जवळच पशूवधगृह असल्यामुळे तेथूनच त्यांना जनावरांचे मांस पुरवले जात असल्याचे अन्वेषणात समोर आले.
पशूवधगृहातील मांस थेट रस्त्यावर !पशूवधगृहातील मांसाचे तुकडे रस्त्यावर इतस्त: पडलेले असतात. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तसेच या तुकड्यांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे या पशूवधगृहाविषयी सातारा नगरपालिका योग्य निर्णय कधी घेणार ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. |