भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी ५ नेत्यांची नियुक्ती !
मुंबई, १५ सप्टेंबर (वार्ता.) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या ५ नेत्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्षांनी अधिवक्त्या माधवी नाईक (ठाणे), विक्रांत पाटील (रायगड), रणधीर सावरकर (अकोला), संजय केणेकर (संभाजीनगर) आणि मुरलीधर मोहोळ (पुणे) यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तात्काळ लागू झाली आहे.