जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण ! – ७ आरोपींना अटक केलेल्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश !
लवंगा (जिल्हा सांगली) – जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी २२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना १५ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. अटकेत असलेले आमसिद्धा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आमसिद्धा हा लवंगा गावातील काँग्रेसच्या महिला सरपंचाचा पुत्र आहे.
संपादकीय भूमिकासाधूंना मारहाणप्रकरणी आरोपी असणार्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाला जनतेने निवडणुकीत लक्षात ठेवावे ! |