ज्ञानवापी प्रकरणी हिंदूंचा पक्ष ऐकल्याविना कोणताही निर्णय देऊ नये !
हिंदूंची अलहाबाद उच्च न्यायालयात याचिका !
वाराणसी – वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी आणि शृंगार गौरी संदर्भातील खटला पुढे चालवण्यात येईल, असा निर्णय नुकताच दिला आहे. यानंतर याला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदु पक्षाकडून उच्रच न्यायालयात एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यात ‘हिंदूचा पक्ष ऐकल्याविना आव्हान याचिकेवर कोणताही निर्णय देण्यात येऊ नये’, अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी याविषयीची माहिती दिली.
ज्ञानवापीमध्ये उरूस साजरा करण्यासाठी मुसलमानांची न्यायालयाकडे मागणी
(उरूस म्हणजे एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव)
मुसलमान पक्षाकडून या संदर्भात अन्य एक याचिका आधीच दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार ज्ञानवापी परिसरातील ३ मजारींवर (मजार म्हणजे मुसलमानांचे थडगे) चादर चढवण्यासह उरूस आदी अन्य धार्मिक कृती करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. यावर येत्या ३ ऑक्टोबरला सुनावणी करण्यात येणार आहे.