पुणे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पबचालकांकडून ‘पार्टी फिलर’ म्हणून वापर !
मेजवानीची रंगत वाढवण्यासाठी तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार
पुणे – येथील पबमध्ये गर्दी वाढवण्यासाठी पबचालकांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘पार्टी फिलर’ म्हणून वापर करण्यात येत आहे. पबमध्ये आलेल्या तरुणांना गर्दी दिसावी, यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. या विद्यार्थ्यांच्या काही शिक्षण संस्थेत पबचालकांनी काही दलाल नेमून दिले आहेत. ते दलाल विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपयांमध्ये पबमध्ये प्रवेश देतात. विद्यार्थ्यांनाही ही रक्कम परवडणारी असते. त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीसुद्धा देण्यात येतात, तसेच मेजवानीची रंगत वाढवण्यासाठी तरुणांना व्यसनांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
शनिवार आणि रविवार या दिवशी पबमध्ये विशेष गर्दी करण्याचा पबचालकांचा प्रयत्न असतो. नामांकित पबचालकांना ‘पार्टी फिलर’ तरुणांची पुष्कळ आवश्यकता नसते; मात्र लहान-मोठ्या पबचालकांना गर्दी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी दलाल प्रत्येक शनिवारी १०० जोडपी मेजवानीसाठी आणतात.
पार्टी फिलर म्हणजे काय?पबमध्ये पुष्कळ मोठी जागा असते. त्यामुळे पबमध्ये जागा मोकळी दिसू नये किंवा गर्दी असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी तरुणांना अल्प रुपयांमध्ये प्रवेश दिला जातो. |
संपादकीय भूमिका
|