मिळे मोक्ष श्री गुरुचरणी ।
साधकांना मोक्षाकडे घेऊन जाणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
गुरुदेवांची गं महती ।
वर्णू कशी, गाऊ कशी ।
कुंठते गं माझी मती ।
भावाश्रू ते येती पुढती ।। १ ।।
स्वभावदोष-अहंच्या आश्रये ।
जीव झाकोळून जाये ।
कृपावंत होऊनी नाम देती ।
गुरु प्रारब्धे गं सोडवती ।। २ ।।
ईश आणि गुरुदेव । दृश्यादृश्याचा तो भेद ।
ब्रह्मांडाचा भार वाहे । दुजा भक्तांना उद्धरे ।। ३ ।।
गुरुदेवांची मूर्ती नटली । ज्ञान, वैराग्य, भक्तीची ।
जन्ममुक्त करिती जाता शरणी । मिळे मोक्ष श्री गुरुचरणी ।। ४ ।।
– सौ. भक्ती प्रमोद गैलाड, ठाणे (३.८.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |