सोलापूर येथील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त साधक आणि धर्मप्रेमी यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
६.२.२०२१ या दिवशी सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्यानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना आणि ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहातांना साधक अन् धर्मप्रेमी यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कुमार समर्थ श्रीनिवास माढेकर, सोलापूर
अ. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सांगितल्याप्रमाणे मी ‘हॅलो’ न म्हणता ‘नमस्कार’ किंवा ‘जय श्रीराम’ म्हणणार आहे. मी आईला ‘मम्मी’ न म्हणता ‘आई’ म्हणणार आहे.
आ. मी आतापर्यंत कधी हिंदु राष्ट्र जागृती सभा बघितली नव्हती. मला हिंदु राष्ट्र जागृती सभा पुष्कळ आवडली.’
२. सौ. वैशाली महामुनी, शिरढोण
अ. ‘मी नातेवाइकांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेची लिंक पाठवली आणि त्यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहाण्याची आठवण करून दिली.
आ. मी हिंदु राष्ट्र-जागृती सभा प्रथमच पाहिली. आम्हाला हिंदु राष्ट्र-जागृती सभेत पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा घरात बसून बघत आहे’, हे विसरूनच गेले. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा मैदानात होत आहे’, असे मला वाटत होते.’
३. सौ. स्वाती महामुनी, भारती विद्यापीठ, सोलापूर
अ. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारानिमित्त जिज्ञासूंशी संपर्क करतांना माझ्या मनाची स्थिती सकारात्मक होती. मला एकच ध्यास होता, तो म्हणजे ‘संपर्क आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा !’ मला यांव्यतिरिक्त डोळ्यांसमोर काहीच दिसत नव्हते.
आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी मला सकाळपासून घरात आणि बाहेरील वातावरणात वेगळाच पालट जाणवत होता. मला वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवून हलके वाटत होते. मला दिवाळी असल्याप्रमाणे वाटत होते.
इ. ‘ज्यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभा बघितली नव्हती, त्यांना ती सभा पहायला मिळाली’, याचा मला झालेला आनंद उच्च कोटीचा होता.
ई. हिंदु राष्ट्र-जागृती सभा चालू झाल्यावर ‘भगवंताचे कार्य चालू आहे आणि ते सर्वांपर्यंत विहंगम मार्गाने पोचत आहे’, असे मला कितीतरी वेळ वाटत होते.
उ. ‘नवीन जिज्ञासू धर्मकार्याशी जोडले गेले आहेत’, याचा मला पुष्कळ आनंद होत होता. मला हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेची संधी मिळाली, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४. सौ. आशा नामधारी, भारती विद्यापीठ, सोलापूर
अ. ‘मी हिंदु राष्ट्र-जागृती सभा चालू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार केला आणि उदबत्ती लावली.
आ. आम्ही (मी, यजमान, मुलगी आणि नात) हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहात होतो. तेव्हा ‘आम्ही चैतन्य ग्रहण करत आहोत’, असे मला वाटले.
इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील घोषणा ऐकतांना आणि देतांना माझ्या शरिरावर रोमांच येत होते.
ई. हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपल्यावर ‘श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र जोरात फिरत आहे’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रातील ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मोठ्याने हसत आहेत’, असे मला दिसले.’
५. सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबेजोगाई
अ. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा चालू असतांना मला जाणवले, ‘संपूर्ण पृथ्वीच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे मैदान आहे. पृथ्वीच्या कणाकणात श्रीकृष्ण आहे. पृथ्वीभोवती दैवी कडे निर्माण झाले आहे. सर्व धर्मप्रेमी मातेच्या कुशीत जयघोष करत आहेत. देवता पुष्पवृष्टी करत आहेत. कृष्णाने शंखनाद केल्याने संपूर्ण वायुमंडलाची शुद्धी होऊन दैवी मंथन चालू होत आहे.’
आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपेपर्यंत मी घरात तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवला होता. त्यामुळे मला पुष्कळ चैतन्य जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक मार्च २०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |